मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
दिगंबरा दिगंबरा

भावगंगा - दिगंबरा दिगंबरा

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


दिगंबरा! दिगंबरा! श्रीपाद वल्लभ दिगंबरा! ॥धृ॥
वैदिक आम्ही तुझे शिपाई
मार्ग दाखवी होउनि आई
संस्कृतिचा तू विजयी तुरा!
श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! ॥१॥
समर्पिताचे सुन्दर जीवन
तिथेच घडते सुखसम्मीलन
आनंदाला आणू घरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा! ॥२॥
‘‘दत्तगुरु जय दत्तगुरु!’’
गर्जुनि आम्ही दिशा भरू
प्रेम अर्पुनि चराचरा;
श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP