भावगंगा - विसरुन प्रभुला मानव फिरतो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
विसरुन प्रभुला मानव फिरतो, कृतघ्न झाला फार
त्यागुनी दात्याचे उपकार ॥धृ॥
झोप लाडकी त्याची झाली
अज्ञानाची मनीं काजळी
चिन्ता नाही त्या मूर्खाला, झाला भूमीस भार ॥१॥
भोजनात हा हुशार भारी
बकबक त्याची कामुक सारी
परनिंदा तर प्रियतम त्याला, दुर्गुण नित गाणार ॥२॥
स्वप्न-रंजनी काळ घालवी
भक्तीची नच फुटे पालवी
कार्य-अकार्यही नकळे, झाला गप्पांचा सरदार ॥३॥
निमंत्रणाविण त्याचे येणे
पशुसम जगभर उगा विहरणे
पुष्ट, परि ना समज सानही, पोळासम जगणार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP