भावगंगा - वैदिकतेचा ध्यास धरा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायाची कास धरा रे! वैदिकतेचा ध्यास धरा ॥धृ॥
जीवनात चैतन्य फुलविण्या, श्रद्धेलाही दृढतर करण्या
कृति-भक्तीचा भाव-फुलोरा सृजन-शक्तिने सावरु या
जय योगेश्वर ! गर्जत आता, वैदिकतेचा ध्यास धरा ॥१॥
मनोमनींचा राम भेटण्या, मानवतेचा धर्म जाणण्या
चराचराचे मर्म जाणुनी, गीतेमधले कर्म करू या
पुरुषार्थाचा मार्ग एकला, वैदिकतेचा ध्यास धरा ॥२॥
मलिन जाहली संस्कृति-गंगा, वादविवादे जमला कचरा
निर्मळ, नीतळ पावित्र्याला आचरणारे चरण धरू या
पांडुरंग ते तुम्हा सांगती, वैदिकतेचा ध्यास धरा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP