भावगंगा - जगन्नाथ तो काशीमधला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जगन्नाथ तो काशीमधला
एकच नाथ खरा, जगाचा, एकच नाथ खरा ॥धृ॥
धनिकां नाही देयक वृत्ती
अपुल्या पोळीसाठी जमती
पडोत तेथे लाख आहुती
मूल्य नसे उंदिरां ॥१॥
काय कथावा सत्तामद तो
ईशाचे अधिकार भोगतो
प्रेमभाव भाषेतच जिरतो
मतलब उभवी तुरा ॥२॥
समतावादी, समाजवादी
परस्परांचे बनती वादी
नजर तयांची निरखी गादी
कोण कुणा आसरा ॥३॥
सुधारणेचे रूप पांघरुन
अचुक बुडविती भोळे बुधजन
लुटती लज्जा युवतींचे धन
लाजविती पामरां ॥४॥
स्वाध्यायी हे समजुन सगळे
द्वारिकानाथाला भुलले
पंढरीनाथा नमन, म्हणाले
घे जवळी वासरां ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP