भावगंगा - हातात गीता मुखी संध्या त्रिकाल
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
धरतीचे लाल आम्ही धरतीचे लाल
हातात गीता मुखी संध्या त्रिकाल ॥धृ॥
धरणी आमुची माता कृष्णदेव पिता
सान थोर भाऊ अमुचे वडिलबंधु दादा
या महान परिवारातील आम्ही बाल ॥१॥
धरतीचा अलंकार अमुचे वृक्षमंदीर
पालन पूजन करूनी पाहू त्यात ईश्वर
या महान मंदिराचे आम्ही रक्षपाल ॥२॥
योगेश्वर प्लॉट अमुचा योगेश्वर शेती
श्रमू त्यात भावाने हीच आमुची भक्ती
या महान शेताचे आम्ही क्षेत्रपाल ॥३॥
गावो-गावी जाऊ प्रेम देऊ घेऊ
अमृतालया बांधु प्रभू भाग देऊ
या महान प्रसादा वाटू आम्ही खुशाल ॥४॥
यज्ञ तीर्थयात्रा वयस्थ संचलन
मत्स्यगंधा, गोरस हे संस्कृती-पूजन
या महान संस्कृतिचे बाल, पाल, लाल ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP