भावगंगा - तीर्थीं न्हाशिल का?
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तीर्थीं न्हाशिल का? तीर्थीं न्हाशिल का? ॥धृ॥
मन-बुद्धीवर मळभट जमता, विपरीताला घरकुल मिळता
स्थिरावलेली जुनी जळमटे, झटकुन उठशील का? ॥१॥
तुला वाटते जन्मापासुनि मत्स्य राहतो पाण्यामधुनी
पावनतेचा तोच अग्रणी, कधि का तरला का? ॥२॥
तर्कातुनि रे तर्कट निघते, हित कोणाला कधी न कळते
उर्मट असली त्यजुनि भाकिते भक्ती करशिल का? ॥३॥
विश्वासाला विचार मिळता, भाव आतुनी उफाळुन येता
संगमातली नितळ ऐक्यता, नेत्री बघशील का? ॥४॥
तुझी भाकरी प्रभु पाठवी, भव्य दिव्य गुण सृष्टी साठवी
अपूर्वतेचा गंध, थोरवी, ध्यानी घेशिल का? ॥५॥
ग्रंथ न कळले तुला बुद्धिचे, भाव खुरटले मनी मनाचे
उठ वाचाया वचन प्रभुचे, इतुके करशिल का? ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP