भावगंगा - रे युवकांनो !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पराक्रमाचा सागर उसळे बुलंद बाहूंवरती
रे युवकांनो, तुमच्यापुढती झुकेल अंबर, धरती ॥धृ.॥
मार्गावरचे तरुवर काटे
सरिता, सागर, खग, नग मोठे
थंडी, पाउस, वादळ, वारे सारे दुबळ्यासाठी ॥१॥
नास्तिकता ही असे निराशा
पाप मनाचे दुबळी आशा
अंधारावर खुणा उमटवा होउनि प्रकाशयात्री ॥२॥
भ्रांत ईश्वरी विवाद सोडा
धर्मामधला कचरा काढा
गांडीव घेउनि कोण होतसे वीर धनंजय जगती ॥३॥
धमनीमधले रक्त पेटू द्या
अंतरात वादळें उठू द्या
जय योगेश्वर मंत्र असूद्या तुमच्या ओठावरती ॥४॥
तुम्हीच वारस नचिकेताचे
प्रल्हादाचे, बाळ ध्रुवाचे
स्वाध्यायाची धुरा अलौकिक तुमच्या खांद्यावरती ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP