मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
हरहर शंकर

भावगंगा - हरहर शंकर

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


हरहर शंकर, हरहर शंभो जगदीश्वर जगराया
ही अजब तुझी रे माया
तव स्मरणाने पवित्र करिसी अमोल अमुची काया
ही अजब तुझी रे माया ॥धृ॥
अज्ञानाने पीडित जनता त्रस्त जाहली तूहि त्राता
संसाराच्या चक्रामधुनी सोडविसी तू राया ॥१॥
तुझी लेकरें हेच विसरलो विस्मरणाने कृतघ्न झालो
संघर्षाने दानव बनलो अपुला घात कराया ॥२॥
तुझ्याप्रती जे जीवन देती मार्गदर्शने कृतार्थ होती
दीन-अनाथाप्रति तू जाशी अभयदान ते द्याया ॥३॥
जन्म हा जरी तुझ्या कृपेने तेजोमय तो करू सेवेने
कार्यासाठी तुझ्याच मंगल अर्पू अमुची काया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP