मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
याचे डोळे लाल लाल

भावगंगा - याचे डोळे लाल लाल

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


याचे डोळे लाल लाल
याच्या हातीं मशाल
याच्या वाणीत देवाची गोडी; अहा!
याची थैथैती नाचती जवानी पहा ॥धृ॥
योगेश्वर व्यापी याच्या अंगाप्रत्यंगा
योद्धा हा सज्ज वरी केसरीय्र रंगा
याच्या डोळ्यात झलक काही वेगळी, पहा
याची थैथैती नाचती जवानी पहा ॥१॥
ज्ञान-प्रकाश हा जगती फिरणारा
अज्ञान अंधकार समूळ नाशणारा
याच्या तेजात संस्कृती हसती पहा
याची थैथैती नाचती जवानी पहा ॥२॥
शोभतो सदा हा प्रभू-विश्वासाने
शक्तीची लगाम हले ईश्वर- हाताने
याची शक्ती सुगंधी भक्ती पहा
याची थैथैती नाचती जवानी पहा ॥३॥
प्रेरणा नि प्रेम पांडुरंगी मिळाले
योगेश्वर आशीष त्याला त्याने लाभले
आता उगवे उषा, रात्र सरली पहा
याची थैथैती नाचती जवानी पहा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP