भावगंगा - दादा सांगती भक्ती-दर्शन
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दादा सांगती भक्ती-दर्शन
विकसित जीवन, प्रभुचे पूजन ॥धृ॥
केवळ कीर्तन, प्रसाद, आरती
उपास आणिक तापस वृत्ती
इतक्यातुन ना उजळे भक्ती
हरिचरणावर हवे समर्पण ॥१॥
भाव असावा प्रभुच्या चरणी
कृति लागावी त्याच कारणी
संस्कृतिसाठी तशीच झुरणी
हे भक्ताचे मंगल लक्षण ॥२॥
बनते उन्नत व्यक्ती जीवन
स्थिरावते नित समाज जीवन
निर्भयताही येते धावुन
भाव-फुलांना देते फुलवुन ॥३॥
कर्म-कुशलता प्रभुला अर्पण
प्रियतम आवड प्रभुला अर्पण
आत्मशक्तिही प्रभुला अर्पण
हे भक्तीचे सुरम्य दर्शन ॥४॥
धष्टपुष्ट जर भक्ती झाली
मनास सोबत घेउन आली
विश्वासाचे गोकुळ बनली
समाजशक्ती उठेल त्यातुन ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP