भावगंगा - चंद्रभागेतीरी पांडुरंग
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
यमुनेच्या तीरी सावळा श्रीहरि
चंद्रभागेतीरी पांडुरंग ॥धृ॥
वेणू वाजवीतो यमुनेच्या तीरी
चंद्रभागेतीरी मुका हरी
यमुनेच्या तीरी गोपाळांची दाटी
चंद्रभागेतीरी वारकरी ॥१॥
रासक्रीडा पाही यमुना माउली
चंद्रभागा मुरडुन मुख न्याहाळी
फेकिली वेणू टाकिली क्रीडा
तरीही आनंदा पार नाही ॥२॥
काय तुझी देवा चतुराई ऐशी
मज पामरासी कैसी कळे
गातो तुझे गुण ध्यातो मी मनात
भेट कृपावंता ! आता कधी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP