भावगंगा - योगेश्वर चरणकमल
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
योगेश्वर चरणकमल नयनिं पाहिले ।
हृदयातिल चित्र तरळ उजळ जाहले ॥धृ.॥
गरगरते चक्र करीं
वाजवितो रणभेरी
पांडुरंग शामल हरि
नवल वर्तले ॥१॥
मंगलमय नव नियती
प्रेमळ हा मृत्यु किती
अभय प्रीत दरवळती
गंध लोपले ॥२॥
माझे मीपण गळले
भावभरित कर जुळले
चरणावर शिर नमले
नयन हरखले ॥३॥
करुणामय अखिल जगत
उरला हरि त्यात स्वगत
माझ्यामधि मी रंगत
विश्व लोपले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2023
TOP