भावगंगा - करु गीतामृत रसपान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गाऊ गीता मिळवू ज्ञान
करु गीतामृत रसपान ॥धृ॥
जे योगी निरहंकारी
ते मुक्तीचे अधिकारी
त्यांचा विश्वाला अभिमान ॥१॥
जे इंद्रिय निग्रह करिती
जे आसक्तीविण फिरती
त्यांच्या हृदयी वसे भगवान ॥२॥
जे पापी सुदुराचारी
तेही उद्धरती नरनारी
लाभे भक्ता आश्वासन ॥३॥
उभा पाठिशी मी असता
माझ्या भक्ताना का चिंता
फक्त यावे त्यांनी शरण ॥४॥
यज्ञ दान तपादि कर्म
चित्त शुद्धीचे व्रतधर्म
तेचि जाणा गंगास्नान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP