भावगंगा - तुझ्यातुनि होईल प्रभु साकार
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जीवन बनुनी फिर जगतामधि पाजित निज पयधार
तुझ्यातुनि होईल प्रभु साकार ॥धृ॥
विशुद्ध शीतल प्रवाहीत तू
तन मन धुत जा काढित किंतू
भेट तुझी सकलांस दिसावी
एकच एक बहार ॥१॥
स्पर्शातिल तव चेतक किमया
प्रगट करी तू प्रभूची माया
सरळ मधुरता वळणावरती
दावित दे ललकार ॥२॥
पात्रापरि धरि रूप वेगळे
सर्वांना करशील आपुले
शिरुन अंतरी कर जगताचा
नकळत तू उद्धार ॥३॥
शयन पयातिल रुचते हरिला
शिवशंकरशिरीं गंगा - महिला
भाव आगळा जाण तयातिल
सावरि गुणसंभार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP