भावगंगा - तुझा भरवसा मला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तुझा भरवसा मला
प्रभु रे! तुझा भरवसा मला ॥धृ॥
सूर्य, चन्द्र, तारे बनवीले
चमकविले नभ त्यांनी सगळे
निर्झर, वर्षा सगळे केले
कृपाळा! काय वर्णु मी तुला ॥१॥
चिंता तुजला जीवमात्राची
जीवन त्यांचे लीला साची
देणगीच तव बहुमोलाची
मला तर मानव तू बनविला ॥२॥
प्रभो! जगताचा चालक पालक
लाख वंदना तुला अमोलिक
जीवन अर्पुन करतो सार्थक
विजय तुझा ही भूक मला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP