भावगंगा - एवढे समजुन करि तू काम
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जाणुन घे रे विश्व कुणाचे
रक्तामधल्या लालीवरचे
कौतुक, किमया, काम
एवढे समजुन करि तू काम ॥धृ॥
कामगार तू शिल्पकार तू
कौशल्याचा कल्पक धनि तू
तुझ्या बळावर राष्ट्र विकसते
गाळ निरंतर घाम ॥१॥
तुझ्यासवे बघ प्रभू राबतो
सहकाराचा हात राखतो
तुझ्या कृतीमधिं भागिदार तो
मजुरित त्याचा दाम ॥२॥
नको मनाला मारु कधि तू
हक्काला जागृत धरि हेतू
नकोस विसरू परी राष्ट्र तू
तसे प्रभूचे नाम ॥३॥
गीता सांगे विश्र् तुझे रे
जाणुन घे ते धागेदोरे
देव, राष्ट्र अन् जीवहि सारे
प्रेमाचे विश्राम ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP