भावगंगा - भले जीवनात येवो प्रकाश नि छाया
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भले जीवनात येवो प्रकाश नि छाया
आगळीच आहे तुझी योगेश्वर माया ॥धृ॥
घन:श्याम तूच आणि तूच गिरिधारी
तूच तर माधव आणि तू मुरारी
कोणी तुज म्हणतात रणछोड राया ॥१॥
रिंगणात मतलबी सर्व फिरतात
तुझे सर्व जग प्रभू ! तेथे राहतात
सांभाळसी सकलास रंक तसा राया ॥२॥
सुखाचा उमाळा नाही दु:खाची गुंफण
तुझ्या कृपेमध्ये राही आनंदी रंगून
येती जाती पुन:पुन्हा कैक पडछाया ॥३॥
तुझ्या सृष्टीत फिरतो मनाच्या मस्तीत
तुझ्या संगतीत भय पळे; ये निवांत
तुझे गीत गातो तुझी माझ्यावर छाया ॥४॥
कुणी म्हणे सान कोणी महाराज दानी
खुशी आहे एक मज तुझा मीही कोणी
तुझ्या कामी झिजवीन हीच माझी काया ॥५॥
दादांची संगत मला मोठे माझे भाग्य
तुझ्या हृदयात आहे प्रीतीचे साम्राज्य
त्यांना पाहता गमसी तूच यदुराया ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 23, 2023
TOP