भावगंगा - योगेश्वर-भाव-कृषी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भक्तीचे अंकुरते कोवळे कोवळे पान
योगेश्वर-भाव-कृषी कल्पनाच छान ॥धृ॥
शेतीला देऊ पाणी होईल प्रभू-पूजन
पूजनात लाभते दिव्य समाधान
अंतिम सुखाचे तेच एक स्थान ॥१॥
प्रभूने मायेने दिले कला-कौशल्य
त्याच्या चरणी वाहून मिळवूया मांगल्य
मांगल्य आणिल कर्तव्याचे भान ॥२॥
सान थोर जमती नि प्रभुबाळे बनती
प्रभु-पिता नात्यासाठी स्वार्थही टाकती
मानव्याला येईल ऐक्याचे उधान ॥३॥
प्रेमाच्या तंतूने बांधलेली माधवी
गावावर प्रेमाची सत्ताही गाजवी
त्यात ना गुलामी वाटे अभिमान ॥४॥
गावात कोणी नुरे बेकार फुकाचा
सर्वास खाऊ, दवा, उद्योग सुखाचा
पाठवीत राही प्रभू प्रसाद आणि ज्ञान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP