भावगंगा - पांग हे फेडू संतांचे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पांग हे फेडू संतांचे
लाडक्या होऊ श्रीहरिच्या ॥धृ॥
अबला नच आम्ही, महिला, भगिनी
आलो शक्ती वसा घेउनी
जोडुनी बंधन प्रेमाचे ॥१॥
संयम सुटला, माणुस चळला
ह्या विश्वाचा तोल बिघडला
दूध हे पाजू संस्कृतिचे ॥२॥
यमदेवाशी झगडू आता
सत्यदेव हा आणू परता
मूल्य हे जाणू सत्याचे ॥३॥
वटवृक्षापरि धर्म सनातन
वृन्दावनसम तन-मन पावन
चिन्ह हे शाश्वत धर्माचे ॥४॥
शिवलिंगाची करु या पूजा
गौरि-हराच्या होउ आत्मजा
वन्दु हे चरण पार्वतीचे ॥५॥
ज्योतीसम उजळू या जीवन
ह्या देहाचे बनवू चंदन
भरू या घडे अमृताचे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP