भावगंगा - जाणुया महती यज्ञाची
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जाणुया महती यज्ञाची
आरती गाऊ तेजाची ॥धृ॥
देव, ब्रह्म, ॠषि, पितरादि भूत
पंचयज्ञ हे आचरती बुध
करूया पूजा सुजनांची ॥१॥
शुद्ध करी मन यज्ञ, दान, तप
ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ परंतप
सांगते गीता कृष्णाची ॥२॥
स्वार्थाविण हे मेघ बरसती
पिके डोलती, वृक्ष बहरती
नदी ही करुणा देवाची ॥३॥
जलदापरि हे जीवन द्यावे
पक्व फळापरी गळुन पडावे
अशी ही शिकवण सृष्टीची ॥४॥
यज्ञचक्र हे अविरत फिरते
सहकार्यातुन जीवन फुलते
वाट ही असे साधकाची ॥५॥
पशुत्व सारे हवन करुया
यज्ञशिखांचे तेज पिऊया
होऊया समिधा यज्ञाची ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP