भावगंगा - दुमदुमते ही धरा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दुमदुमते ही धरा गर्जते गगन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥धृ०॥
यौवन प्रभु-स्पर्शाने थैथै नाचे
काफला विराट हा रूप शक्तिचे
एक एक काळजात भक्तिचे जतन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥१॥
याच क्षणी ललकारू असुरां सदा
'जन्म नसे माझा जगीं हारण्या कदा'
जाळण्यास असुरांस उरि सदा हवन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥२॥
संघ-शक्ति आज संक्रांत व्हायची
अशक्यता सरून शक्यताच यायची
ईश अंतरात पुजुन उठवुया गगन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥३॥
भक्तीची शक्ती आम्ही दाखवू जगास
लाचारी दैन्य त्यजुन आणुया मिजास
मस्तीने अस्मितेच्या भरु सदा सदन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥४॥
ऋषि-मुनिंची वाट आज मनुज विसरला
विसरला प्रभूस म्हणुन दुःखी जाहला
समजावू त्यास, करी प्रभुस तू नमन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥५॥
विश्वामधिं अतुल भारतीय संस्कृती
नाही तोड या जगात एक आकृती
काम तिचे आम्ही करू, हवन करू जीवन
वयस्थ संचलन वयस्थ संचलन ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP