भावगंगा - होऊ सैनिक खरे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
होऊ सैनिक खरे काम प्रभूचे करणारे
करणारे, काम करणारे, होऊ सैनिक खरे ॥धृ॥
आम्ही कृष्णाची गीता गाणारे
आम्ही हृदय हरीला देणारे
गावागावात रामधुन नेणारे
होऊ सैनिक खरे ॥१॥
आम्ही महिमा श्रमाचा जाणणारे
नाही खोट्या आशेला भुलणारे
कधी केला आरंभ ना सोडणारे
होऊ सैनिक खरे ॥२॥
आम्ही साधक कधी न थकणारे
नाही टाकून तपाला पळणारे
धरू मनात ते पूर्ण करणारे
होऊ सैनिक खरे ॥३॥
आम्ही भक्तीच्या शक्तीने डोलणारे
आम्ही ऐक्यात मुक्तीस शोधणारे
आम्ही दुष्ट वृत्तीला टाकणारे
होऊ सैनिक खरे ॥४॥
आम्ही प्रेमाने सर्वांस मिळणारे
भावभक्तीने सृष्टीला भेटणारे
आम्ही सर्वात प्रभू निरखणारे
होऊ सैनिक खरे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP