भावगंगा - पेटती मशाल
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पेटती मशाल ही, पेटते विचार हे
भावना न पेटता जागते न विश्व हे ॥धृ॥
क्रान्तिमंत्र गाउनी क्रान्ती नाहि जाहली
डोंब भावना बनून शान्त उषा उगवली ॥१॥
दिव्य भास्करापुढे नम्र व्हा चला पुढे
कालची उद्या, प्रभात आज ठाकली पुढे ॥२॥
झोपडी व कोठरी, कंदरें, दरि, कडे
हाक तुम्हा मारती देवदूत ! या इकडे ॥३॥
तुम्ही सांगा भक्तिभाव स्नेह झरे ज्यातुनी
ईश आत बैसला काढतो तो ध्वनी ॥४॥
जाणते बना जरा, पटोत त्यांना खुणा
बाळ द्या आईच्या मांडीवरी देखणा ॥५॥
एक शीर नमविले तुम्ही जरी चरणावरी
प्रभु म्हणेल भक्त खरे स्मरुनि तुम्हा अंतरीं ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP