मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
बिचकू नको रे

भावगंगा - बिचकू नको रे

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


बिचकू नको रे जीवन सुधार स्वाध्याय देईल त्याला आकार ॥धृ॥
भेदाभेदाला तेथे न थारा
समानतेचा फुले फुलोरा
भावाला प्रेमाला घेऊन जा ॥१॥
गुपीत मोकळे तेथे खेळते
धर्माधर्माचे वचन कळते
पाखंडी मानस घेऊन जा ॥२॥
सरळ जीवन आनंद-भुवन
दंभ गळतो नम्र बनून
कसाही केव्हाही भेटत जा ॥३॥
समज येईल माझा मी कोण
जग प्रभूचे नाते लक्षण
अजाण परी तू तेथेच जा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP