भावगंगा - हा देव तरी आहे कसा?
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
कुणी तरी सांगेल का देव आहे कसा?
हा देव तरी आहे कसा? पाहू त्याला कोठे कसा? ॥धृ॥
निळ्यानिळ्या आभाळातून चंद्रसूर्य ताऱ्यांतून
लुकलुकणाऱ्या चांदण्यातून, माझ्याकडे बघणारा देव आहे कसा?
हा देव तरी आहे कसा? पाहू त्याला कोठे कसा? ॥१॥
काळ्याकाळ्या ढगातून कडकडणाऱ्या वीजेतून
सरसरणाऱ्या सरीतून, सप्तरंगी इंद्रधुनूतून
माझ्याशी खेळणारा देव आहे कसा ?
हा देव तरी आहे कसा ? पाहू त्याला कोठे कसा ? ॥२॥
हिरव्या हिरव्या पानांतून लाल पिवळ्या फुलांतून
दरवळणाऱ्या गंधातून, आंबट गोड फळांतून
मला खाऊ देणारा देव आहे कसा?
हा देव तरी आहे कसा ? पाहू त्याला कोठे कसा ? ॥३॥
पांढऱ्याशुभ्र सशातून मोती-मनी-माऊतून
राघू-मैना-कोकिळेतून, माझ्याशी बोलणारा देव आहे कसा?
हा देव तरी आहे कसा ? पाहू त्याला कोठे कसा ॥४॥
आईच्या स्पर्शातून, बाबांच्या नजरेतून
गुरूजींच्या मायेतून, माझ्यासाठी श्रमणारा देव आहे कसा ?
हा देव तरी आहे कसा ? पाहू त्याला कोठे कसा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP