भावगंगा - सागरात मंदिर बांधतो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
सागरात मंदिर बांधतो, दादा ! सागरात मंदिर बांधतो
मत्स्यगंधा हे नावहि ठेवतो, तरते मंदिर म्हणतो ॥धृ॥
मुक्ती आली स्वाध्यायाने, व्यसने मुळची गेली
सुधबुध येता नाहीं कळली, भेट शिवाशी झाली
सागरपुत्र नाव लाभता भेद अचानक पळतो ॥१॥
सांज-सकाळी, दुपारी सुद्धा पूजा प्रभुची करतो
त्रिकाळसंध्या घडते हरिचे नाव सदोदित जपतो
गीता रुचिने गातो, दादा ! गीता रुचिने गातो ॥२॥
गोवर्धनगिरिधारी कृष्णासोबत अविरत असतो
त्याची मायापाखर सुखकर रात्रंदिन अनुभवतो
अफाट दर्यावरती त्याचा आधार रक्षण करतो ॥३॥
मासेमारी पावन झाली ! पूजा बनली दादा !
कुणी न नोकर, कुणी न मालक, भक्ती प्रभुचा-धंदा
कलाकुशलता अर्पण करतो, प्रेम त्यामधीं भरतो ॥४॥
कायदा झाला सागरतीरी, उपाशी कोणी नसतो
असतो धंदा सर्वां हातीं, आळस पळतो, जळतो
अडचण नाही कुणास कसली, आशिष प्रभुचा मिळतो ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP