भावगंगा - तीन गोष्टी ठेवू सतत याद
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तीन गोष्टी ठेवू सतत याद
जीवनात आणूया मधुर स्वाद ॥धृ॥
श्वासासंगे व्हावा प्रभु सहवास
झोपता, उठता जेवता खास
जीवनास समजा प्रभू-प्रसाद ॥१॥
उठता सकाळी पहिल्याने
करदर्शन करू प्रेमाने
ऐकूया आपण ॠषींचा साद ॥२॥
हाताच्या मुळात शारदा-वास
कराग्री वसते लक्ष्मी खास
मध्ये हाताच्या हरिचे पाद ॥३॥
करूया बुद्धीला ज्ञानोपदेश
आगळा कर्माचा नवसंदेश
हातात भक्तीचा भरला नाद ॥४॥
भोजन मानूया प्रभु-प्रसाद
त्यानेच येईल मधुर स्वाद
जेवताना करूया कृष्णास याद ॥५॥
झोपण्यापूर्वी स्मरूया राम
ईश-मांडीवर खरा आराम
स्मरूया अंतरी प्रभुचे पाद ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP