भावगंगा - हो ! आम्ही आगरी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हो ! आम्ही आगरी
भेटूया सागरी
सर करु डोंगरी आम्ही पांडुरंगी आगरी ॥धृ॥
मीठ पिकवून मिठागर बनवू
मेलेल्या माणसात राम पुन्हा आणू हो ऽ हो ऽ ॥१॥
भातशेती लावून भावकृषी करु
भावफेरी करून सद्गुण पेरू हो ऽ हो ऽ ऽ ॥२॥
वीटभट्टी लावून भक्ती पक्की करु
खेडोपाडी जाऊन खेडी एक करु हो ऽ हो ऽ ॥३॥
रेती खेडी काढून घरदार बांधू
वैदिक संस्कृतीचा जीर्णोद्धार करु हो ऽ हो ऽ ॥४॥
मासेमारी करुन एकादशी करु
मत्स्यगंधा बांधून जीवनप्रसाद करु हो ऽ हो ऽ ॥५॥
एकवीरा आईला एक वीरा भेटला
आगरी नि सागरी पांडुरंगी केला हो ऽ हो ऽ ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP