भावगंगा - जाऊ देवाचिया मंदिरीं
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जाऊ देवाचिया मंदिरीं
बनुनि पुजारी-जाऊ देवाचिया मंदिरीं ॥धृ॥
सद्विचारांनी आणि सद्गुणांनी
जीवनवृक्ष आणू बहरोनी
मन आणि बुद्धि पवित्र करूनी
वाहू देवाचिया चरणी-जाऊ देवाचिया मंदिरीं ॥१॥
फुलांचा सुगंध फुलांची कोमलता
फुलांचे सौंदर्य फुलवुनि जीवनी
नररत्नांची माला गुंफुनी
वाहू देवाचिया चरणी-जाऊ देवाचिया मंदिरीं ॥२॥
ज्ञान कर्म आणि भक्तिच्या रसांनी
जीवनफळ मधुर करुनी
नैवेद्य अर्पू प्रभुच्या चरणी
गीतामृत वाटू हरिकीर्तनी-जाऊ देवाचिया मंदिरीं ॥३॥
स्वाध्याय मंत्र करूनी सफल
जीवन-प्रवाह करुया निर्मल
प्रभुकार्य करुया मिळोनी सकल
‘पांडुरंग दावी’ मार्ग उज्जवल-जाऊ देवाचिया मंदिरीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP