भावगंगा - काम प्रभूचे करणार्या
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
काम प्रभूचे करणार्या रे जरा समजून चाल रे
तुझ्या वाटेत पत्थर नि काटे, रे जरा समजून चाल रे ॥धृ॥
दीर्घ कामाला निष्ठा प्रबळ हवी
पळभर धरून सोडणार्या रे ॥१॥
खोट्या स्तुतीने भुलू नको बाबा
मानासाठी मरणार्या रे ॥२॥
छोटेसे मन आणि अहम् मोठासा
कार्य बरे तोडणाऱ्या रे ॥३॥
'हरी साधन तू' विसरू नको बाबा
जगन्नाथाला भुलणार्या रे ॥४॥
'हाले-डुले कधी माझ्याविना पान ?'
अहंकार राखणाऱ्या रे ॥५॥
कार्य मोठे आणि कर्ताही मोठा
अहम्-महाल बांधणार्या रे ॥६॥
बुद्धिला आंधळी काम-क्रोध करी
त्यांत सदा रमणार्या रे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP