भावगंगा - अगदी साधी गोष्ट
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अगदी साधी गोष्ट सांगतो नाथाघरची खूण
नजर बदल बा! हरी पाहसी ओट्यावर बैसून ॥धृ॥
समोर पाही उभा डोंगर त्याला नाही पाय
स्थिरावलेला कधी हलेना कोण तयाची माय?
विचार करि तू सूज्ञ मानवा पहा जरा निरखून
दगडामध्ये हरी नांदतो धरतो रूप सगुण ॥१॥
सागर लहरे, तुरुतुरु चाले पहा लाट डौलात
साद ऐक रे! सूर गोडसे कानी पडती शांत
निरोप अलगद त्यांतुनी येतो वाऱ्यावर बैसून
गोडगोडसा मना दिलासा भगवंता जवळून ॥२॥
फुलें पहा ही अंगणि हसती ती किमया कोणाची?
सुगंध येतो कसा, कोठुनी तारिफ त्या लीलेची
फुलाफुलांमधि हरि रमतो हा उदास का बेभान
निरखी त्याचे रूप मनोहर हस रे हस रे छान ॥३॥
गुरुच्या भेटित लघुता टाकी जगताला दे मान
व्यापक होउन भगवंताचे पहा पहा महिमान
वामन रमतो विराट गमतो भक्तसखा भगवान
गा गा! त्याचे गूण सदोदित नको शोधु तू रान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP