भावगंगा - छानदार गाव
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जेथे स्थिरावला स्वाध्यायी-भाव
बघा, असे आहे छानदार गाव ॥धृ॥
उष:काल होता उठते सारे गाव शान्त
बिगीबिगी स्नाने उरकुन येति मंदिरात
त्यांच्या मुखावर संतोषाची ठेव
बघा, असे आहे छानदार गाव ॥१॥
मंदिरात घुमतो तेव्हा मंगल निनाद
प्रार्थनेत देव नि भक्त घालतात साद
तेथे गमतात सारे उमराव
बघा, असे आहे छानदार गाव ॥२॥
खाता पीता आठव त्यांना जगत् चालकाचा
स्मरुनि नाम त्याचे घेती प्रसाद कृपेचा
नाही विसरती कधी एक देव
बघा, असे आहे छानदार गाव ॥३॥
श्रमाने मिळाले घेती म्हणती देतो देव
भाग त्याचा काढुनि घेती उरले एकमेव
त्यांचे सुख नाही खेळत कधी डाव
बघा, असे आहे छानदार गाव ॥४॥
राव नाही रंकहि नाही बांधवांचे गांव
सहकार मोठा त्यांचे तेच एक नाव
तेथे मानवाला आहे मोठा भाव
बघा, असे आहे छानदार गाव ॥५॥
आपुलेच देती परि ना घेती आणिकांचे
देव भक्त मिळुनी तेथे राज्य प्रेमिकांचे
नाही उणीव अभय तेथे राव
बघा, असे आहे छानदार गाव ॥६॥
उठा उठा भाग्यवंत त्याचा घेऊ शोध
आपुल्याही गावासाठी मिळेल त्याचा बोध
देऊ जगतास गीतेचा हा भाव
बघा, असे आहे छानदार गाव ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP