भावगंगा - सावळा योगेश्वर श्रीहरी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
आकाशीं वा मंदिरी नाही, फिरतो पृथ्वीवरी
सावळा योगेश्वर श्रीहरी ॥धृ॥
सदा बांधुनी कासोटा कटी
धुंडाळी हा भक्त-राहुटी
दीन, अनाथे जिथे हिंपुटी
तेंथे करि चाकरी ॥१॥
दुर्बळ जीवांचे बल बनुनी
सुदर्शनाने रक्षण करुनी
शंख फुंकुनी, हित गुणगुणुनी
सज्जनता उद्धरी ॥२॥
गोपाळांना प्रेम शिकविले
मामा परि कंसाला वधिले
भक्त पांडवांचे हित केले
सत्य जपे गिरिधारी ॥३॥
मंगल होते मरण, सुखाशा
कथिली शास्त्रांची परिभाषा
गीता देउन दिला दिलासा
निर्भयता दे करीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP