भावगंगा - उगा रडसी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
उगा रडसी जरा हस ना क्षणिक घे स्वाद भक्तीचा
प्रभू आहे निकट जवळी कळावा स्पर्शही त्याचा ॥धृ॥
कुणी म्हणती क्षणिक जगती कशाला लोभ जीवाचा
परी टाकू नको त्याला लाडका तोच देवाचा ॥१॥
करी शृंगार भक्तीचा भुलावा देव भावाचा
उभा राहून तो बघतो दिसावा कोण प्रीतीचा ॥२॥
मधुर मुरली तुझे जीवन घुमव तू सूर अंतरीचा
रुचिर सुरात त्या रमतो मुरारी नाथ विश्वाचा ॥३॥
जरा मस्ती मनीं भरता तिला दे साज नामाचा
करीं येई भरून पेला तुझ्यासाठी प्रसादाचा ॥४॥
करावा वाटला प्रेमा शोध तू भक्त भावाचा
प्रभू ज्याचा सखा आहे जया ना स्पर्श मोहाचा ॥५॥
त्यजावी भीती एकच तू धरावा हात विवेकाचा
जगत् लीला खरे कौतुक प्रभूचा लक्ष्य हो साचा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP