मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
संतांच्या त्या पवित्र चरणी

भावगंगा - संतांच्या त्या पवित्र चरणी

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


संतांच्या त्या पवित्र चरणी
देह असो माझा देवा
परीस होउनि पवित्र करिती
अमोल दाखविती ठेवा ॥धृ॥
मजजवळी तो सदाच असुनी
दूर जातसे लुप्त होउनी
दिव्यदृष्टि मजला देउनिया
अमोल दाखविला ठेवा ॥१॥
अमोल ठेवा प्रगट हा नसे
विषयभ्रमाने वेढिला असे
प्रभु तव नामे नष्ट होतसे
अज्ञानाचा हा कावा ॥२॥
स्वाध्यायाने तव भक्तीने
विश्वबन्धुता ती हृदयाने
विश्वाचे नंदनवन प्रेमे
होईल हा मज वर द्यावा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP