भावगंगा - मानू स्वाध्याय उपासना
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
मानू स्वाध्याय उपासना
आणू सुगंध या जीवना ॥धृ॥
देव मंदिरात तसा शरीरात
हेचि ज्ञान, ही आराधना ॥१॥
द्यावे तन मन प्रभूसाठी धन
हेचि दान, हीच दक्षिणा ॥२॥
होऊ वारकरी गीता नेऊ घरी
व्रत हेचि, हीच साधना ॥३॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी
ध्यान हेचि, हीच अर्चना ॥४॥
अशी भक्ती व्हावी प्रभो शक्ती द्यावी
'तूच वसो मनी', प्रार्थना ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP