भावगंगा - मनुष्य गौरव मनुष्य गौरव
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
मनुष्य गौरव मनुष्य गौरव स्वाध्यायाचे दुसरे नाव
त्याच्यासाठी व्रतस्थ होऊन फिरुया आपण गावोगाव ॥धृ॥
गरीब कुणी ना पूंजीपती भेद कशाला द्या माती
समाजवादी भांडवलवादी नाहीत कोणी रंक नि राव ॥१॥
जाती धर्म वादळ उठते मानव चिरडित ते फिरते
उपाय त्यावर भक्ती सांगू; राजनीती ना; बंधुभाव ॥२॥
उन्नत अवनत भेद त्यजू मार्ग सांगूनी योग्य उजू
रक्त सारखे तुमचेह अमुचे, कशास मग हा दूजाभाव ॥३॥
पूज्य नारी माता भगिनी, पत्नी, कन्या स्मरुन मनी
उद्धारक ना; रक्षक होऊ, घराघरातिल मिटवू तणाव ॥४॥
शिक्षण बदलू, यज्ञ करू, प्रबोधनाचा मार्ग धरू
अमृतालये, योगेश्वर कृषी, वृक्षमंदिरे करिती उठाव ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP