भावगंगा - अहो दादा ! सांगा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अहो दादा ! सांगा मला येतो काकुळतीला
स्वाध्यायी इतुका कसा लाडका तुम्हाला ॥धृ॥
गालात हसू हलके, खुशी त्यांची सांगे
'सर्व धाव संस्कृतिसाठी नाही पुढेमागे
जिवाची ना खंत, पाय हो
काटयांनी सोलला' म्हणुनि लाडका झाला ॥१॥
'व्हावा जीव तेजोमय बनुनि पुरुषार्थी
मोठी आवड ज्ञानाची आजीवनं विद्यार्थी
वागणूक विवेकाची हो
धरी निश्चयाला' म्हणुनि लाडका झाला ॥२॥
'स्वाध्याय - गोवर्धन त्याने सावरलेला
माझी फक्त करंगळी भार त्याला झाला
अन्याय पाहून हा हो
अंतरी तापला" म्हणुनि लाडका झाला ॥३॥
दाटल्या दिलाने जेव्हा दादा बोलतात
प्रेम-भाव-भक्ती भरले दिल खोलतात
'मतलबी जगतामध्ये हो
स्वाध्यायी निराळा' म्हणुनि लाडका झाला ॥४॥
'भाव-भूक आणिक त्याला प्रभू-प्रेम-तृष्णा
संस्कृति जगती मोठी, मनीं ती कामना
राहो जग ज्योतिर्मय हो
हाच ध्यास त्याला' म्हणुनि लाडका झाला ॥५॥
'अढळ निष्ठेने आणिक निष्काम भावाने
प्रभुकार्य करुनी जपे ध्येय आदराने
घालिल गळा योगेश्वर हो
त्याच्या जयमाला' म्हणुनि लाडका झाला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP