भावगंगा - थेंब थेंब पाऊस टपटपतो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
थेंब थेंब पाऊस टपटपतो
झुळझुळ ओढा खळखळतो ॥धृ॥
थेंब थेंब टिपला झाडांनी
मस्त बहरली पानांनी
खोडकर वारा घुटमळतो
झोके देतो, मग पळतो ॥१॥
थेंब थेंब टिपला मातीने
नव्या तरूंच्या आईने
हिरवा रंग कसा हसतो
तरुबाळांचा जिवलग तो ॥२॥
थेंब थेंब टिपला विहिरींनी
तुडुंब भरल्या पाण्यानी
मोद तृप्तिचा मुसमुसतो
लाटांच्या गजरीं डुलतो ॥३॥
थेंब थेंब टिपला दगडांनी
आंघोळ केली वर्षांनी
आंघोळीने गुण कळतो
संस्काराचा धर्मच तो ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP