भावगंगा - गांडिव घेऊन हाती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गांडिव घेऊन हाती तू अर्जुन हो युवान
तुझ्या पाठिशा उभा आहे योगेश्वर भगवान ॥धृ॥
दुर्योधन हा अजून येथे सत्ता भोगत आहे
दु:शासन हा अजुन सतीची लज्जा फेडित आहे
ओढ धनूची दोरी कर तू अचूक शरसंधान ॥१॥
सती द्रौपदी कृष्ण सख्याला हाका मारित आहे
भीष्म, द्रोण हे फक्त ‘बिचारे’ होऊन बसले आहेत
तू तर बच्चा वाघाचा हे तुला असू दे भान ॥२॥
प्रजा बळीची भोगामध्ये रूतून बसली आहे
मिळेल तेथुन हिरण्याक्ष हे सोने लुटीत आहे
विकृत झाले आज भूवरी यज्ञ आणखी दान ॥३॥
अजून रावण वेष बदलुनी भिक्षा मागत आहे
वानरसेना शक्ती हरवुनी सचिंत बसली आहे
सागर लंघुन जाता ठरशिल पवनपुत्र हनुमान ॥४॥
कुंभकर्ण हे अजून येथे झोपा झोडत आहेत
ज्ञानी सगळे पोकळ चर्चा करीत बसले आहेत
सांग जगाला गीतेमधले कर्म, भक्ती अन् ज्ञान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2023
TOP