भावगंगा - युगे युगे वाट किती पाहिली
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
युगे युगे वाट किती पाहिली
दर्शनाची ओढ तुझ्या लागली ॥धृ॥
एकदाची भेट व्हावी
मूर्ती तुझी पाहत रहावी
पाहताना तुझ्याकडे, नयनांची लवलव थांबली ॥१॥
बाधत होते 'मी' पण
नकळत नमली मान
नमताना तुझ्यापुढे, शरीराची सरळता वाकली ॥२॥
सुख-दुःखे पापे भारी
सांगून टाकावी सारी
सांगताना तुझ्याकडे, रसनेची वळवळ थांबली ॥३॥
गोड तुझी अमृतवाणी
सतत पडावी कानी
ऐकताना तुझ्यापुढे, श्रवणांची स्तब्धता ही वाढली ॥४॥
पाठीवर पडली थाप
सप्तजन्म धुतले पाप
पांडुरंगी स्पर्शामुळे, हृदयाची स्पंदनेही थांबली ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP