भावगंगा - हे शुभ्र तारे चालले
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
उमललेल्या भावनांचे पांडुरंगी पुष्प झाले
मुक्त झाल्या वेदनांचे कर्म भक्ती अंग झाले ॥धृ॥
दिव्यतेची भव्यतेची ज्योत जेथे पेटली
नजर ह्यांची शोधते हे कोणे येथे झोपले ॥१॥
पेटते हे रक्त ह्यांचे जागवाया जन-मना
नेसुनी जे हिंडती अंधतेची वल्कले ॥२॥
कोण होते राम कृष्ण ह्या इथे ह्यांना विचारा
तोच आहे ह्याच देही वेड ज्यांनी घेतले ॥३॥
डोलती हे शेष सारे पाहुनी त्या पांडुरंगा
वैष्णवांचे विश्व ज्यांनी मस्तकावर पेलले ॥४॥
भ्रष्ट झालेल्या जगाला कोणती क्रांती हवी
त्या शिवाला घेऊनी हे शुभ्र तारे चालले ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP