भावगंगा - आम्ही सैनिक
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
आम्ही सैनिक सैनिक रे देवा तुझ्याच आज्ञेत (राज्यात) रे ॥धृ॥
गावोगावी फिरू
आम्ही स्वाध्याय करू
मुखी गाऊ प्रभू नाम रे
आम्ही सैनिक सैनिक रे ॥१॥
स्वाध्याय चाले जेथे
सुखशान्ती तेथे
समाधान खेळे नांदे रे
आम्ही सैनिक सैनिक रे ॥२॥
आमच्या हातीं गीता
सांगू जीवन-गाथा
प्रीती, भक्ती अमोलिक रे
आम्ही सैनिक सैनिक रे ॥३॥
यज्ञ तप दान
शुद्ध करी मन
गीता प्रमाण आम्हास रे
आम्ही सैनिक सैनिक रे ॥४॥
आमचा धर्म एक
गीता सांगे नेक
जीव देऊ तिच्यासाठी रे
आम्ही सैनिक सैनिक रे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP