भावगंगा - हे दिव्यदृष्टीदाता
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हे दिव्यदृष्टीदाता चैतन्यदाता तुज नमो ॥धृ॥
सहकार्य प्रेम भाव ज्या घरात वसते
त्यागाच्या तालावर संगीत ते गाते
सुख-दुःखातील साथ दृढतर जे करते
आत्मईशश्रद्धेने मंदिर ते बनते
ते कुटुंब, तो पाया, देश धर्म संस्कृतीचा ॥१॥
बंधुभाव भक्तीने गांव नित्य उठतील
गीतेच्या गानाचे सूर ऐकू येतील
हर कुटुंब योगेश्वर मंदिर हे भासेल
दैवी विचारांनी जाग जगा येईल
हा देशचि माझे घर, हे विश्वचि माझे घर ॥२॥
निराशा विफलता नि विध्वंसक वृत्ती
लाचारी दैन्य आज आसवे ढाळिती
गवसली दिशा ध्येय पदीं आली गती
ताठ उभा तरूण आज गरजत आहे
कृण्वन्तो विश्वम् आर्यम्, कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP