भावगंगा - एकादशी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
एकादशी व्रत अतिशय पावन, नित तेवति फुलवात
भक्तिचा उगम तिच्या हृदयात ॥धृ॥
सुंदर जीवन लपले, दडले
शोधाया हे व्रत सांगितले
परी आज ते मलिन जहाले
स्वच्छ करू ती वाट ॥१॥
कृतज्ञतेने समर्पिलेला
हरि-मिलनास्तव मुक्त राखला
दिवस असा हा सौभाग्याचा
बनवु नये ती रात ॥२॥
समय, शक्ती अन् संपत्तीवर
हक्क प्रभूचा जो योगेश्वर
दान जुने हे, व्रत वडिलांचे
पवित्र ती वहिवाट ॥३॥
उपवासाला कसला खाऊ?
जवळ बैसुनी मनास वाहू
पुरते इतुके प्रभु-प्रेमाला
करु त्याला सुरुवात ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP