मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
असेल असु द्या अवघड वाट

भावगंगा - असेल असु द्या अवघड वाट

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


असेल असु द्या अवघड वाट
अवतीभवती तम घनदाट
स्वाध्यायाचे साधक आम्ही नवीन मळवू पाउलवाट ॥धृ॥
या वाटेचा रंग नवनवा
या वाटेचा गंध नवनवा
या वाटेवर कृतिभक्तीचे झुळझुळती हे नवथर पाट ॥१॥
स्वाध्यायाचा दीप करीं धरू
गजर प्रभूचा घरोघरीं करू
नामस्मरणे पहा प्रगटते सुख-शान्तीची रम्य पहाट ॥२॥
स्नानाने तन होते निर्मळ
राहुन जातो मनावरी मळ
सत्संगाने पावन करुया मनगंगेचा गढूळ काठ ॥३॥
मद-मोहाचे करुया तर्पण
भाव मनींचे हे कृष्णार्पण
निर्धाराचे निशाण घेउन उतरुन जाऊ दुर्गम घाट ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP