भावगंगा - दादा, तुमचा शब्द ऐकता
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दादा, तुमचा शब्द ऐकता मनास आली जाग
पाच लक्ष लोकांच्या फुलली मनात गीता-बाग ॥धृ॥
त्रिकालसंध्या गुणगुणताना काम करी भाई
झोप लागता गंगामाई कुरवाळुन जाई
सरस्वतीच्या सौभाग्याला कधी न लावू डाग ॥१॥
जगातले जन आले आणिक गीता घेउन गेले
‘जय योगेश्वर’ मंत्र प्रभूचा ओठावरती उमले
व्रतस्थ होउन काढू निर्मळ भगवंताचा भाग ॥२॥
कुणी न कोणा ओळखणारा जन येथे जमला
नाते जुळता देवाशी मग गर्व मनीचा गळला
अजून अमुच्या हृदयामध्ये जपतो प्रयाग-याग ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP