भावगंगा - भजनात होता मन दंग
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भजनात होता मन दंग
हृदयात दिसे पांडुरंग ॥धृ॥
हा ईश इथे साकार
मानव्य धरी आकार
प्रीतिचा जणू हुंकार
मती मानी जया श्रीरंग ॥१॥
ही वत्सल-मूर्ती सगूण
भक्तिचे रूप निर्गूण
अव्यक्त राहि बिलगून
ना कधी शान्तिला भंग ॥२॥
हा परिस नव्हे चिंतामणि
ना कल्पवृक्ष संजीवनि
ना अमृत, जादू, करणी
हा मनुजाचा निज रंग ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP