भावगंगा - करत प्रभूचे काम
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
करत प्रभूचे काम, मानवा घे तू त्याचे नाम ॥धृ॥
रोज सकाळी तोच उठवितो
जे खावे ते अन्न पचवितो
थकून निजता तो सर्वांना करतो शांतीदान ॥१॥
नातेच नच हे व्यवहाराचे
हे नाते तर अति प्रेमाचे
या नात्याची गोडी चाखत जीव शिव विसरे भान ॥२॥
ॠषीसंगाने नित्य निरंतर
हे नाते व्हावे अति दृढतर
क्रमाक्रमाने पिता, सखा ते प्रियतम व्हावा राम ॥३॥
भक्तीतील शक्ती ही कळावी
पंचरंगी क्रांती ही घडावी
मुखामुखातील ‘‘जय योगेश्वर’’ जिंके युद्ध महान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP