भावगंगा - नसती केवळ श्वेतवस्त्रे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
नसती केवळ श्वेतवस्त्रे; फडकती शान्तिध्वजा
लाडकी क्रान्तीच त्यांना, जी प्रभूची आत्मजा ॥धृ॥
मोकळ्या हास्यात त्यांच्या फुल्ल पुष्पाची मजा
गंध भावांचा सखा तर प्रेम सुंदर पद्मजा ॥१॥
निश्चयाचे स्वामि ते जणु शंभु कैलासावरी
दाटते कारुण्य त्यांच्या हृदयिं गंगोत्रीपरी ॥२॥
ज्ञानगंगा भगिरथाला शंभु देई भूवरी
पामराला शिकविती ते गीता पावन शुभकरी ॥३॥
पान वा पुष्पें नको वा आसवांचे पय नको
मागल्याविण देव देतो, सांगती, तुज भय नको ॥४॥
तर्क जेथे थांबतो अन् खुंटते बुद्धी चलाख
मानवाच्या उन्नतीचे मार्ग दाविति लाख लाख ॥५॥
भक्तिच्या वाटेतले काटे निवडती बोचरे
रामरंगी रंगण्याचा देति स्वाध्याय मंत्र रे! ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP